परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी मित्रांनी केली मित्राच्या आईची हत्या

October 28, 2014 11:03 AM0 commentsViews:

ambaranth_muder28 ऑक्टोबर : परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी मित्रांच्या मदतीने आपल्या आईची हत्या घडवून आणण्याची खळबळजनक घटना उघड झालीये. अंबरनाथमध्ये 17 ऑक्टोबरला स्नेहलता उमरोटकर या महिलीचे राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. अखेर या हत्येच गूढ उकलण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश आलंय. स्नेहलता उमरोटकर या महिलेच्या मुलाच्या मित्रांनीच हत्या केली असल्याचं पोलीस तपासात सामोर आलंय. या प्रकरणी या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई जवळील अंबरनाथमध्ये 17 ऑक्टोबर रोजी स्नेहल उमरोटकर या 52 वर्षाच्या महिलेची तिच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातील चोरीच्या उद्देशाने उमरोटकर यांची हत्या करण्यात झाली असा संशय होता पण पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवल्यानंर हत्येच गूढ उकललं गेलं. स्नेहल उमरोटकर यांची हत्या त्याच्या मुलाच्या मित्रांनीच केली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. गेल्या 6 महिन्यापासून मुलगा आदित्य उमरोटकर आणि त्याच्या मित्रांनी हा कट रचला होता. आदित्याचाच घरातूनच चोरीकरून परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी त्याच्या आईचे दागिने आणि रोकड़ चोरी करायची मात्र प्रत्यक्ष घटना घडत असताना पुरावा मागे राहू नये या करता त्यानी स्नेहल यांचा खून केला. विरेंद्र नायडू ( 22 ) अश्विनिकुनल सिंह ( 22 ) आणि विशाल भासले( 17) यांनी हे भयानक कृत केले या तिघांपैकी एक इंजिनिअरिंगचा तर इतर दोन कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. या तिघांना 302 ,394 अशा कलमाअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close