भाजपमध्ये गटबाजी; मी अजूनही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत -खडसे

October 28, 2014 2:29 PM0 commentsViews:

eknath_khadse_banner28 ऑक्टोबर : मुख्यमंत्री कोण होणार ? याची घोषणा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना भाजपमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी सुरू झालीये. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे आणि नाही झालो तरी आनंद आहे अशी उघड प्रतिक्रिया भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलीये.

मी नाराज नाही. पक्षांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून लढवय्या आहे. आजपर्यंत आघाडी सरकार विरोधात लढत राहिलो त्यामुळे आज आमचं सरकार येत आहे याचा मला जास्त आनंद आहे असंही खडसे म्हणाले.

तर दुसरीकडे आतापर्यंत नितीन गडकरींनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त करणारे सुधीर मुनगंटीवार यांनीही सुचक विधान केलंय. चार वाजेपर्यंत थांबा पक्षाचा काय तो निर्णय होईलच. आम्ही सगळे नेते मिळून निर्णय घेतो. फ़डणवीस यांचं नाव असो अथवा गडकरींचं नाव यावर सर्व एकमताने निर्णय घेतला जाईल असा खुलासाच मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे भाजपच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहण्याचं ठरणार आहे.

दरम्यान, या बैठकीसाठीमुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे सर्व आमदार आणि राज्यातले खासदार पक्षाच्या कार्यालयात जमा व्हायला लागले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close