गड आला पण पद्म’सिंह’ गेला – उद्धव ठाकरे

June 9, 2009 3:14 PM0 commentsViews: 15

9 जून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पद्मसिंह पाटील प्रकरणावरून शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पवारांना जनाची नाही, निदान मनाची लाज ठेऊन तरी पद्मसिंहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी, उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'आत्ताच्या 'जाणत्या राजा'मुळे खुर्ची वाचली. गड आला पण पद्म'सिंह' गेला,' अशा शब्दात पवारांवर टीकेची झोड उठवली. यावेळी उद्धव यांनी शिवस्मारक समितीवरून बाबासाहेब पुरंदरेंना हटवण्यावरून, तसंच इतिहासाच्या पुस्तकातून दादोजी कोंडदेव यांचा शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून उल्लेख हटवण्यावर तीव्र आक्षेप घेतला. हा आक्षेप घेताना राज्य सरकार आणि मराठा संघटनांना उध्दव यांनी टीकेचं लक्ष्य केलं.

close