ऑस्ट्रेलियात वांशिक तेढीत वाढ : भारतीयांचा ऑस्ट्रेलियन नागरिकांवर हल्ला

June 9, 2009 3:18 PM0 commentsViews: 1

9 जून अल्बान्स रेल्वे स्टेशनवर बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या 20 वर्षांच्या ऑस्ट्रेलियन तरुणाला मारहाण करण्यात आली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्ले पाहता भारतीयांनी या ऑस्ट्रेलियन वंशाच्या लोकांवर हल्ले केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांकडून मारहाण करण्यात आली असल्याच्या मुद्द्यावर भारतीयांची एकजूट वाढत आहे. एकमेकांना संरक्षण देण्यासाठी ते एकत्र येताहेत. त्यातून या घटना घडत आहेत का, असाही संशय ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. काल सोमवारी काही भारतीयांनी एका 20 वर्षीय मुलाला मानेवर आणि हातावर मारहाण केल्याची बातमी आहे. तो आणि त्याच्या मित्रांनी काही अपशब्द वापरले, त्यानंतर भारतीयांच्या एका गटाने तिथल्या एका स्थानिकाची कार पेटवून दिली होती.