सेनेत उपमुख्यमंत्रिपदासाठी अनिल देसाईंचं नाव आघाडीवर?

October 28, 2014 4:25 PM1 commentViews:

anil desai28 ऑक्टोबर : एकीकडे भाजप सत्तास्थापनेसाठी आज दावा करणार आहे तर दुसरीकडे शिवसेनेमध्येहीे हालचालींना वेग आलाय. ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या नेते जमले आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंना गटनेतेपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास अनिल देसाईंचं नाव आघाडीवर आहे. अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी आहेत विश्‍वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालीय. दरम्यान, शिवसेनेनं आज आपली भूमिका आणखी मवाळ केली. युती होण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजेत, असं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. तर युतीचा निर्णय शिवसेनेनं घ्यायचाय, असं भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी म्हटलं आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    प्रश्न चिन्ह असलेल्या बातम्या देत जाऊ नका. ज्याला त्याला प्रश्न चिन्ह असलेल्या बातम्या द्यायला मजा येते नंतर हात झटकून मोकळे. हे मीड्या वाले स्वतःच्या मनातले सांगत असतात , त्यांना काय वाटते ते सर्व प्रश्न चिन्ह टाकून बातम्या द्यायच्या आणी लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा आणी टी आर पी वाढवायची !!

close