देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री

October 28, 2014 4:49 PM3 commentsViews:

fadanvis_cm_34565628 ऑक्टोबर :‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र’ अखेर हा नारा खरा ठरला आहे. राज्याला देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सुचक म्हणून एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार अनुमोदन केलंय. फडणवीस हे राज्याचे 22 मुख्यमंत्री ठरले आहेत. फडणवीस यांच्या रुपाने विदर्भाला चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला आहे. फडणवीसांना संघाची मान्यता असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं सर्वप्रथम दिली होती. फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केलाय. नागपुरात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जात आहे.

‘देवेंद्र फडणवीस ये नागपूरने देशको दी हुई एक सौगात है’, या कौतुकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांनाच मोदींची पहिली पसंती मिळेल याचा अंदाज आला होता. 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू व्यक्तिमत्व यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचं स्थान बळकट केलं. देवेंद्र यांचा जन्म 22 जुलै 1970 मध्ये झाला. देवेंद्र यांच्यावर लहानपणापासूनच राजकारणाचे संस्कार झाले. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. तर काकू शोभा फडणवीस या युती सरकारमध्ये मंत्री होत्या. देवेंद्रनी नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.

1987 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव झाले. वयाच्या 21व्या वर्षी ते रामनगर वॉर्डातून नगरसेवक झाले. 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर झाले, तेव्हा त्यांचं वय फक्त 27 वर्षं होतं. देशात सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा त्यांना मान मिळाला होता. 2 वर्षांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. 2010मध्ये त्यांची भाजपचे महासचिव म्हणून नेमणूक झाली आणि गेल्या वर्षी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली.

अभ्यासूपणाबरोबरच स्वच्छ प्रतिमा ही देवेंद्र यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना संघाचेही आशीर्वाद मिळू शकतात. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत होती. खुद्द देवेंद्र फडणवीस स्वतंत्र विदर्भाच्या बाजूचे आहेत. पण आता त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आलीय. त्यामुळे राज्याला एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

 फडणवीस यांचा राजकीय प्रवास
- 22 जुलै 1970 रोजी जन्म
- देवेंद्र यांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू
- वडील गंगाधर फडणवीस विधान परिषदेचे आमदार
- काकू शोभा फडणवीस युती सरकारमध्ये मंत्री
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी
- 1987मध्ये अभाविपचे सहसचिव
- 1992मध्ये रामनगर वॉर्डातून नगरसेवक
- वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे महापौर
- देशात सर्वात लहान वयाचा महापौर होण्याचा मान
- 1999मध्ये नागपूर पश्चिममधून आमदार
- 2010मध्ये भाजपचे महासचिव म्हणून नेमणूक
- 2013मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती

(सविस्तर बातमी लवकरच)
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sandesh Choudhari

  Bhatala dili osari bhat haat pay pasari. Aata Maharashtrache tukade
  honarach. Are kuthe nevun thevala akhand Maharashtra Majha! Balasaheb
  tumhala khup miss karto />

 • prashik

  @ Sandesh Chaodhari.. Abe Chatayche aahe ka Tya AKHAND maharashtala, Jyat Vidarbahchya vatyala fakta BABUJI KA TALLU alay

  • Ravi Kesarkar

   मित्रा, विधर्भाच्या वाट्याला तू म्हटल्या प्रमाणे बाबाजी चा ठुल्लू का आला ? आतापर्यंत विधर्भाने किती मंत्री आणी मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले ह्याचा अगोदर विचार कर, मग त्यांनी , विधर्भाचा म्हणावा तितका विकास का केला नाही ? नेहमीच सत्तेच्या लालसेपोटी विधार्भाचे घोंगडे त्यांनी भिजत ठिवले आहे, आणी विधर्भाच्या तोंडाला पाने पुसली आहेत , हे तुमच्या लक्षात का येत नाही. राहता राहिली गोष्ट तुम्ही म्हटल्या प्रमाणे अखंड महाराष्टाला का चाटायचा आहे का ? आपली लायकी तरी आहे का ? ज्यांनी त्या अखंड महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे त्यांच्या आत्म्याचा तरी विचार कर !
   ज्या महाराष्ट्राच्या मातीत तू उभा आहेस त्यालाच तोडायची भाषा करणे योग्य नाही… आता देवेंद्र फडणवीस यांना सांग बाबाजी चा ठुल्लू दाखऊ नका आणी विधर्भाचा विकास करा !!

close