फडणवीसांसह छोटे मंत्रिमंडळ शपथ घेणार -नड्डा

October 28, 2014 8:15 PM1 commentViews:

nadda28 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते असून मुख्यमंत्रिपदाची धूरा ते नेटाने सांभाळतील. आता 31 तारखेला शपथविधी होणार असून त्यावेळी एक छोट मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल नव्या मुख्यमंत्र्यांसह शपथही घेतील अशी माहिती भाजपचे नेते जे.पी.नड्डा यांनी दिली.

तसंच शिवसेनेनं सोबत यावं ही आमची इच्छा त्यासंदर्भात सेना नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच सुख:द बातमी येईल असंही नड्डा यांनी स्पष्ट केलं. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंंत्रिपदी निवड झाली.

आज झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपचे तमाम नेतेमंडळी उपस्थित होते. त्यानंतर नड्डा मीडियाशी बोलत होते. मात्र या छोट्या मंत्रिमंडळात कोण असणार आहे हे मात्र गुलदस्त्याच आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    मोदी, सिंग , शाह , नड्डा , रूडी , माथुर हेच आता ठरवणार मंत्री कोण आणी मंत्री मंडळ छोटे की मोठे ? कांग्रेसला आतापर्यंत शिव्या शाप वाहणारे हे, की दिल्लीतून महाराष्ट्राचा कारभार चालतो असे म्हणणारे आता गप्प का ? आता काय महाराष्ट्राचा कारभार वेगळा चालतोय ?

close