मंदीचा प्रभाव कमी होतोय – मनमोहन सिंग

June 9, 2009 3:21 PM0 commentsViews: 1

9 जून अर्थव्यवस्थेवर अजूनही मंदीचा प्रभाव असून आर्थिक तुटीचं प्रमाणही वाढलं असल्याचं मत पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी संसदेत स्पष्ट केलं आहे. मात्र असं असलं तरी सरकारी योजना रखडणार नाहीत. तसंच येत्या काही दिवसांत पायाभूत सुविधांवर सगळ्यात जास्त पैसे खर्च केले जाऊ शकतात, असंही मनमोहन सिंग यांनी आज संसदेत स्पष्ट केलं आहे. खर्च वाढल्याने महागाई दरात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आर्थिक संकटातही येत्या काही वर्षांत जीडीपीचा दर 8 ते 9 टक्क्यांपर्यंत स्थिर राखू शकतो, असंही मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या मते अर्थव्यवस्था ही दबावा खाली आहे. तसंच फिस्कल डेफिशिएन्सी वाढत आहे. पण सरकारकडे कोणत्याही योजनासाठी पैशांची काही कमी नाही आहेत. तर त्यांनी इन्फ्रास्टक्चर प्रकल्पांनमध्ये जास्त पैसे गुंतवण्यास पूर्णपणे मान्यता आहे, असंही पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले.

close