एसएससी बोर्डाच्या अकरावीतप्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मिळणार 90 टक्के आरक्षण

June 9, 2009 3:23 PM0 commentsViews: 2

9 जून यंदाच्या एसएससी बोर्डाच्या अकरावीत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना 90 टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तसंच अकरावीचे प्रवेश हे ऑनलाईनच भरले जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला होता.आयसीएसई, सीबीएसई, दिल्ली बोर्ड या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे अकरावीत एसएससी बोर्डाचे विद्यार्थी केंद्रीय बोर्डाच्या तुलनेत प्रवेशात मागे पडतात. यावर राज्य सरकारचा पर्सेन्टाईलचा निर्णय हायकोर्टाने रद्द ठरवला होता. त्यानंतर बेस्ट ऑफ फाईव्ह हेही सूत्र लागू करण्याचा विचार सरकार करत होतं. पण अखेरीस एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर एकमत झालेलं आहे. आता त्याला कोणी न्यायालयात आव्हान देऊ नये, यासाठी कायदेशीर मतं मागवलेली आहे.

close