राष्ट्रवादी पद्मसिंह यांच्यामागे खंबीरपणे उभी

June 9, 2009 3:27 PM0 commentsViews: 2

9 जून पवनराजे निंबाळकर खून प्रकणातले आरोपी पद्मसिंह पाटील यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी राहिली आहे. कायदेशीर बाबी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पद्मसिंह यांच्यावर कोणतीच कारवाई करणार नाही, असं पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तसंच पद्मसिंहांना कोर्ट दोषी ठरवेपर्यंत पक्ष त्यांना निरपराधी मानतं, असंही त्रिपाठी यांनी सांगितलं. या घटनेचा आगामी निवडणुकीत कोणताही परिणाम होणार नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती कायम राहील, असं त्यांनी सांगितलं.

close