वाघाच्या बछड्याचा उपासमारीमुळे मृत्यू

October 28, 2014 11:16 PM0 commentsViews:

28 ऑक्टोबर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात असलेल्या कराडच्या अभयारण्यात एका वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडालीये. कराडच्या अभयारण्यातील वाघाचा हा बछडा केवळ 14 महिन्यांचा होता. त्याचा मृत्यू हा उपासमारीनं झाल्याची माहिती मुख्य वन संरक्षकांनी दिलीये. उपासमारीमुळे वाघाचा मृत्यू झाल्यामुळे वनाधिकार्‍यांचा हलगर्जीपणा उघड झालाय. हा बछडा चांदिया या वाघिणीचा असल्याचंही वन अधिकार्‍यांनी सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close