प्रवीण दरेकर भाजपच्या वाटेवर? आशिष शेलारांची घेतली भेट

October 29, 2014 8:57 AM0 commentsViews:

parveen darekar and ashish shelar meet29  ऑक्टोबर :  मनसेमध्ये नाराज असलेले माजी आमदार प्रवीण दरेकर हे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मनसे नेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांची वरळीतील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली.

प्रवीण दरेकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरेकर यांच्या राज्यातील भाजप नेत्यांशी भेटी-गाठी सुरू होत्या. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दरेकर नाराज आहेत. त्यांचे बाळा नांदगावकर यांच्यासोबत असलेले मतभेदही उघड झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची भेटही घेतली होती. मात्र त्यांची नाराजी दूर झाल्याचं दिसत नाहीये. दरेकरांनी जर मनसे सोडली तर मनसेला हा दुसरा झटका असेल, कारण यापूर्वीच आमदार राम कदम यांनी मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close