चोरीचा ‘भुयारी’ मार्ग; हरियाणात पंजाब नॅशनल बँकेवर दरोडा

October 29, 2014 10:27 AM0 commentsViews:

Robbery Tunnel

29 ऑक्टोबर :  दरोडे टाकताना चोरट्यांनी अनेक हिकमती लढवल्याचं वेळोवेळी दिसत असतं. हरियाणामधल्या सोनपत जिल्ह्यातील बँकेत असाच दरोडा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी चक्क 125 फूट लांबीचं आणि अटीच फूट रुंदीचं हे भुयार खोदून त्यांनी पंजाब नॅशनल बँकेतल्या जवळपास 90 लॉकर्स फोडून कोट्यावधी रुपये लुटले आहेत. त्यामध्ये रोकड, दागिने यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सोनपतपासून 200 किलोमिटर अंतरावर पंजाब नॅशनल बँक आहे. दरोडेखोरांनी एका रिकाम्या घरापासून बँकेपर्यंत भुयार खोदली आहे. योग्य योजना आखून भुयार खोदण्यात आलं आणि यासाठी कमीतकमी एक महिन्याचा कालावधी लागला असावा असं अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे. आश्चर्य म्हणजे भुयार खोदण्याचं काम सुरु असताना, बँकेच्या एकाही कर्मचार्‍यांना याची चाहूलही लागली नाही. लॉकर रुममध्ये भुयाराचा एक भाग खुला असल्याचं दिसला, तर दुसरा भाग बँकेपासून जवळ असलेल्या रिकाम्या घरात असल्याचं स्पष्ट झालं. चोरांनी रात्रीच्या वेळी चोरांनी हे मिशन पूर्ण केलं असल्याचं ही पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिस दरोडेखोरांचा तपास करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close