राजीनामा देणार नाही – पद्मसिंह पाटील

June 9, 2009 3:39 PM0 commentsViews: 6

9 जून खासदारकीचा राजीनामा देणार नाही असं राष्ट्रवादीच्या पद्मसिंह पाटील यांनी म्हटलंय. पद्मसिंह पाटील सध्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीयाच्या कोठडीत आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे. आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही असं सांगत पद्मसिंह यांनी उलट राजीनामा देण्यासारखं आपण काय केलंय ? असा बिनधास्त प्रश्न विचारलाय. विरोधकांचं काम राजी नामा मागणं एवढंच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. सतिश मंदाडे आणि मोहन शुक्ल यांच्याबरोबर आपले फोटो असू शकतात कारण आपण 40 वर्षं राजकारणात आहोत. हजारो कार्यकर्त्यांशी आपली ओळख आहे. आपण किती लोकांना लक्षात ठेवावं ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

close