शपथविधीला अंबानी, रतन टाटा, अमिताभ आणि सलमानही येणार

October 29, 2014 4:48 PM1 commentViews:

oath ceremony

29 ऑक्टोबर : राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 31 तारखेला वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी भाजपने वेगवेगळ्या विभांगासाठी अनेकांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे.

या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी, रतन टाटा, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, अमिताभ बच्चन, सलमान खान यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री, देशातले उद्योगपती, बॉलिवूड स्टार, राज्यातले व्यापारी, परदेशातले राजदूत यांच्यासोबतच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    फडणवीस काल म्हणाले होते हे आपले सरकार आहे , सर्वसामान्यांचे सरकार आहे … माझा प्रश्न हा आहे की … ह्या सर्वांना तुम्ही बोलवत आहात कारण हे सर्व मिडया फेम आहेत ह्यांचा चका -चौंद मीडया ला लागत असतो पण सर्व सामन्यांना वानखेडेवर प्रवेश आहे का ?
    हेच राजकारणी सांगतात , लग्न वैगरे सोहळ्यामध्ये वारेमाफ खर्च करू नये आणी यांनी खर्च कमी केला आणी साधेपणात सोहळा केला तर तो जास्त आदर्श ठरणार नाही का ?

close