एएन-32 या एअरफोर्सच्या विमानाला अपघात

June 10, 2009 8:41 AM0 commentsViews: 2

10 जून भारतीय एअरफोर्सच्या विमानाला अरुणाचल प्रदेशात मंगळवारी दुपारी अपघात झाला. त्यात 13 जण ठार झाले आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये हवाईदलाचे 6 अधिकारी आणि सात जवानांचा समावेश आहे. अपघात झालेलं एएन-32 हे विमान रशियन बनावटीचं होतं. लष्कराच्या वाहतुकीसाठी ते वापरलं जात होतं. अरुणाचलप्रदेशातल्या मेन्चुका इथून या विमानाने दुपारी दोन वाजता उड्डाण केलं आणि त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच विमानाचा संपर्क तुटून अपघात झाला. विमान आणि अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.

close