भाजपसोबत युती ?, शिवसेनेचा निर्णय उद्यावर !

October 29, 2014 11:03 PM1 commentViews:

sanjay raut29 ऑक्टोबर : उद्यापर्यंत थांबा, भाजपशी युती करायची की नाही याबद्दलचा निर्णय आता उद्या होईल अशी भूमिका आता शिवसेनेनं जाहीर केलीय. शिवसेनेच्या सर्व नेत्यांची ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्यापर्यंत वाट पाहा एवढंच सांगून निर्णय उद्यावर ढकलला आहे.

भाजपने सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला आहे आता दोनच दिवसांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथही घेणार आहे. भाजपने शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केली खरी पण अंतिम निर्णय न घेतल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदार आणि खासदार, नेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली. तडजोड करून सरकारमध्ये सहभागी व्हायचं की स्वाभिमान जपत विरोधी बाकांवर बसायचं असा प्रश्न शिवसेनेसमोर आहे. त्यामुळेच आज सकाळपासून शिवसेनेच्या चर्चेचं गुर्‍हाळ सुरू होतं. आज शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीत भाजपसोबत जायचं की नाही यावर चर्चा झाली. त्यानंतर रात्री शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपशी युती करायची की नाही याबद्दलचा निर्णय आता उद्या होणार आहे तोपर्यंत ‘इंतजार करा’ असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    मागील काही दिवसात जे महाराष्ट्रचे राजकारण तापलंय याला एकमेव कारण आदरणीय पवार साहेबांचे ” पाठींबा” धोरण, त्यांनी “आम्ही बाहेरून बिन शर्त पाठींबा द्यायला तयार आहोत” हे एक सूत्री वाक्य बोलले नसते तर आज महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी दिशा दिसली असती, आणी ह्या एकाच वाक्यामुळे भाजपा च्या डोक्यात हवा गेली असे मला वाटते , यांच्या ह्या एका वाक्या मुळे शिवसेना आणी भाजपा ची दुरी अजून वाढली आणी तेच कदाचीत पवार साहेबांना हवे असेल, तुम्ही आपसा-आपसात भांडा ,फायदा फक्त राष्ट्रवादीला कारण मी प्रचंड आशावादी !!

close