दांडी यात्रेतले बापू

October 29, 2014 11:13 PM0 commentsViews:

29 ऑक्टोबर : आंतराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांनी गांधीजींच्या ‘दांडी यात्रेवर’ एक शिल्प साकारलंय. आयआयटी पवई आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने हे शिल्प उभारण्यात येणार आहे. गेली दोन वर्षं साठे यांनी या शिल्पावर मेहनत घेतली आणि आता ते पूर्ण झालंय. आता काही दिवसांतच ते आय.आय.टी. पवईमध्ये उभारलं जाईल. महात्मा गांधीजी यांचं देशातलं पहिले शिल्प सुद्धा शिल्पकार  सदाशिवराव साठे यांनी 1953 साली तयार केलं होतं. ते शिल्प सध्या दिल्लीत आहे. त्यानंतरसुद्धा त्यांनी गांधीजींची अनेक शिल्पं साकारलीयत. पण, ‘दांडी यात्रेवरचं’ हे शिल्प त्यांनी 89 व्या वर्षी तयार केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close