असा रंगणार ‘महा’शपथविधी सोहळा !

October 29, 2014 11:46 PM0 commentsViews:

stage329 ऑक्टोबर : तब्बल 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाजपला सत्तास्थापन करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपने शानदार अशा शपथविधी सोहळ्याची तयारी केली आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. वानखेडेवर शपथविधी सोहळ्यासाठी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी सेट डिझायनिंग केलंय. भव्य असा स्टेज साकारण्यात आलाय. या सेटच्या मागे भव्य व्हिडिओ वॉल असणार आहे. या व्हिडिओ वॉलवर महाराष्ट्राची परंपरा, कला, पर्यटन,संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करुन शपथविधीला सुरुवात होणार आहे शपथविधी सोहळ्याआधी महाराष्ट्राची लोकधारा हा नृत्याचा कार्यक्रमही होणार आहे.

विशेष म्हणजे या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळाही दिमाखदार होणार आहे. त्यासाठी उद्योगपती, ऑलिम्पिकविजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, साहित्यिक, बॉलीवुड अभिनेत, अशा सर्व मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय.

हे दिग्गज येणार शपथविधीला

- उद्योगपती रतन टाटा
– उद्योगपती मुकेश अंबानी
– उद्योगपती अनिल अंबानी
– क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
– क्रिकेटपटू सुनील गावसकर
– क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर
– हॉकीपटू धनराज पिल्ले
– हॉकीपटू युवराज वाल्मिकी
– नेमबाज अंजली भागवत
– संत साहित्यचे अभ्यासक सदानंद मोरे
– साहित्यिक राजन खान
– अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन
– अभिनेता सलमान खान
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close