मोदींच्या स्वच्छतेच्या आवाहनाला बिग बींचाही प्रतिसाद

October 30, 2014 10:13 AM0 commentsViews:

Big B Sweeping

30 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सर्व क्षेत्रातून चांगलाचं प्रतिसाद मिळत आहे. सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी, सलमान खान यांच्यानंतर आता बॉलीबूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही हातात झाडू घेऊन या अभियानात सहभागी झाले.

बिग बी रोज मॉर्निंग वॉकला जातात. आज सकाळी मॅर्निंग वॉक झाल्यानंतर त्यांच्या हातात झाडू दिसला. अमिताभ यांनी आपल्या जुहू इथल्या निवासस्थानाजवळ च्या भागात साफसफाई केली आहे. तसंच या आभियानात प्रत्येकाने सहभागी होण्याचा आव्हानही त्यांनी केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close