राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का? शिवसेनेचा भाजपला सवाल

October 30, 2014 11:00 AM8 commentsViews:

20devendra-uddhav

29 ऑक्टोबर :  एकीकडे भाजपशी पुन्हा युती करण्यावरून शिवसेनेत विचारमंथन होत असतानाच, भाजप आता राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत सेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

‘विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्रानं कवटाळला’ असं सामनाच्या आजच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे. ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस आलेत, त्या विदर्भात राष्ट्रवादीनं सिंचन घोटाळे करून ठेवलेत. आता त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवलं जाणार का असा सवाल या अग्रलेखात विचारला आहे.

शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय? महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व काँग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला आहात आणि ज्या विदर्भातून आपण आला आहात त्याच विदर्भात जलसिंचनाचे मोठे घोटाळे राष्ट्रवादीवाल्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे देवेंद्र सरकारच्या पावित्र्याचा प्रश्न सुरुवातीपासूनच निर्माण झाल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे ते भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे गाडण्यासाठी; पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा असंही या अग्रलेखात म्हटलं आहे. मात्र राज्य स्थिर असावे व स्थिर राज्याचा मुख्यमंत्री स्थिर असावा, अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • vishal

  bjp shevsenela khelvat ahe sene ne tyanna na jumanta virodhat basave he sarkar 5 varshe purn karu shaknar nahi he jantela mahiti ahe tyamule pudhe senechech sarkar yeil

 • Suresh

  पवार साहेबान्नी एक पत्ता टाकून आमचा पत्ता गुल केला॰
  राष्ट्रवादीने आमची गोची केली
  नी आमचे महत्व कमी केले हे आमचे खरे दु:ख आहे.

 • Milind Manohar Godbole

  जेंव्हा अफझल्खान, आदिलशहा, कोथळा वगैरे भाषा झाली, ती काय भाजपाचा सन्मान होता का…? तरीही भाजपा नेते शांत राहिले होते हे लक्षात घ्या…
  या आधीही जून पासूनच सामनामधून अत्यंत हीन पातळीवर उतरून भाजपावर / मोदींवर थेट टीका चालली होती, तीही केंद्रीय मंत्रीमंडळात सामील असताना…
  त्या आधीही अनेक वर्षात अनेक वेळा सामनातून भाजपावर हीन पातळीवर उतरून टीका झाली आहे…
  प्रतिभा पाटील – मुखर्जी पाठींबा प्रकरणे, एनरॉन प्रकरण हे सर्व काय भाजप्चा सन्मान होता का…?

  सर्वात कहर म्हणजे देवेंद्र बद्दल अजूनही पूर्ण चुकीची माहिती शिवसैनिकांकडून वाईट शब्दात पसरवली जातेय… आणि कसली स्वाभीमानाची भाषा करते शिवसेना…? प्रथम स्वत: जी पापे केलेली आहेत वर्षानुवर्षे युतीत राहूनही, त्याचे परिणाम भोगायला तयार रहावे…

  • Ganesh

   kasale parinam….shivsene ne chuk keli he manya….aani BJP ne tya sathi tyanchi sath gheoo naye…pan reality madhe prashna rahtoch na…ki BJP , rastravadi barobar gheoon sarkar chalvnar…hi nahi ka ghan patali…ulat me mhanen hi tar aamchyshi gaddari karna aamhi BJP la vote kela te ya sathi nahi…mhanje hey sagale ek aahet….pakshacha maan/aapmaan madhe janatacha vishwas ghat karnar ka BJP???? wa changli palwat aahe…

  • Vikrant Chavhan

   आदरणीय गोडबोले साहेब , शिवसेनेवर एवढा राग योग्य नाही , जाऊ द्या हो जे होणार असेल ते होईल तुम्ही कृपया “गोड बोला “., डोक्यात राग घालून घेऊ नका. आपलीच माणसे आपल्याच माणसाशी भांडणे योग्य आहे का ?

 • Pratik Sawant

  “BJP can do Anything to form Govt.” – they will take support of NCP also.. as of they have taken 50/60 candidates from NCP & Congress.. (Most Of Them Are CRIMINALS)

  From last 15 yrs BJP need Shiv Sena why because to Grow in MAHARASHTRA & Now when thy got 122 seats they dont wnt SHiv Sena!! WHY?

  BJP has Cheated with Maharashtra, Most Of the Big Projects of Maharashtra have been shifted to GUJARAT.. WHY??

  After election within 24hrs BJP renamed BELGAV as BEGAVI.. WHY?

 • Pratik Sawant

  Last Week there was a News of Malad that Shiv Sena Gatapramuk was been Murder.. as he was protecting a girl from Local Mavali..

  There are many of such cases happened in MAHARASHTRA where Shiv Sena fight against such Crime..
  In Mumbai we are safe because of Shiv Sena, Specially Marathi Peoples..
  Shiv Sena Has Given many things to our Marathi Peoples..
  We Wore – We Are – & We Will Be With Shiv Sena Forever..

 • rohan kadam

  kattar shivsenikana he kay desai ani bolatat na te avadat nhi balasabenani as kadhi kel hot ka ata nhi pn 2019 la nkki bhagava fadkau raj saheb pn asatil teva apalya barobar jar bjp barobar yuti kelit tr shivsenik tumala bmc la tumch kay chalay te dakhaun deil fkt ekch balasaheb

close