ठाण्यात सार्वजनिक टॉयलेटमध्ये स्फोट, एकाचा मृत्यू

October 30, 2014 9:35 AM0 commentsViews:

thane crime sences

30 ऑक्टोबर : ठाण्यात लोकमान्य नगर परिसरात काल रात्री 8.30च्या सुमारास एका सार्वजनिक टॉयलेटच्या टाकीचा स्फोट झाला. या अपघातात आकाश सिंघवी या 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर जिलेदार सिंग हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांना ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे पालिकेने लक्ष न दिल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आता या ठिकाणी ढिगारा उपसून दुरुस्तीचं काम होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close