मराठी दिग्दर्शकांनी नवनवीन प्रयोग करावेत – जब्बार पटेल

June 10, 2009 9:01 AM0 commentsViews: 5

10 जून कोल्हापुरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. यावेळी डॉ.जब्बार पटेल यांनी दर्जेदार मराठी सिनेमांमुळं मराठी सिनेसृष्टीला उत्तम दिवस आलेत आणि म्हणूनच दिग्दर्शकांनी नवनवीन प्रयोग करावे,असं आवाहन केलं. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सिनेमांबरोबर हरिश्चंद्राची फॅक्टरी, गाभ्रीचा पाऊस, गंध, जोगवा आणि मर्मबंध हे पाच मराठी सिनेमे दाखविण्यात आले. तसेच भारतीय व परदेशी भाषांमधील सिनेमे दाखवले गेले. डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते ' हरिश्चंद्राची फॅक्टरी ' या सिनेमाला सर्वाधिक प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार देण्यात आला.

close