विधानपरिषदेसाठी माणिकराव ठाकरेंचा अर्ज दाखल

June 10, 2009 11:02 AM0 commentsViews: 7

10 जून, मुंबई विधानपरिषदेच्या एका जागेसाठी माणिकराव ठाकरेंनी अर्ज भरला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि इतर नेते ही उपस्थित होते. गोविंदराव आदिक यांनी विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे या रिकाम्या झालेल्या जागेसाठी काँग्रेसने माणिकराव ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. ठाकरेंच्या विरोधात खरंतर शिवसेनेला उमेदवार उभा करायचा आहे. पण ही जागा आपण लढवायची की नाही किंवा भाजपला सोडायची याबाबत शिवसेनेत बराच खल केला जात आहे.

close