वाघोबा तुम्ही सापडणार!

October 30, 2014 5:04 PM0 commentsViews:

30 ऑक्टोबर : चंद्रपूरमधल्या ताडोबा प्रकल्पातल्या वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचा राज्यातला पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. एका नर आणि मादी वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आली आहे. या रेडिओ कॉलरमुळे वाघांच्या शिकारीचं प्रमाणही चांगलंच कमी होईल कारण रेडिओ कॉलरमुळे आता 24 तास वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. येत्या काळात आणखी 3 वाघांसह 5 बिबट्यांना रेडिओ कॉलर लावली जाईल वाघांच्या सवयी, राहण्याची ठिकाणं हे सर्व रेकॉर्ड होत राहील. वाघांच्या रेडिओ कॉलरमुळे त्यांच्या हालचाली वन विभागाच्या कॉम्प्युटरमध्ये थेट रेकॉर्ड होतील आणि वाघांच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल. डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अभ्यासकांनी ही रेडिओ कॉलर बसवले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close