आमच्याही 2 नेत्यांना शपथ द्यावी ?

October 30, 2014 5:00 PM1 commentViews:

sena on modi30 ऑक्टोबर : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासह भाजपचे छोटेखानी मंत्रिमंडळही शपथ घेणार आहेत. पण या मंत्रिमंडळात आमच्या दोन नेत्यांनाही शपथ देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

शिवसेना भाजप सरकारसोबत सामील होणार का याविषयी अजूनही अंतिम निर्णय झालेला नसला तरी आज (गुरुवारी) संध्याकाळी बैठकीनंतर उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपने एकत्र सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले आहे. शिवसेनेनं यासंदर्भात भाजपकडे आपला प्रस्ताव सादर केलाय. उद्या 31 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या शपथविधीच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना शपथ देण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी आहे. भाजप या मागणीचा सकारात्मक विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना उद्या शपथविधीच्या कार्यक्रमात शपथ मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    पूर्ण खात्री असलेल्या बातम्या द्या … सूत्राकडून आणी प्रश्न चिन्ह टाकून बातम्या देणे बंद करा , अशा बातम्या देऊन लोकांची माथी भडकऊ नका

close