सेहवाग टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर : भारतीय टीमला धक्का

June 10, 2009 11:07 AM0 commentsViews: 32

10 जून टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत दणक्यात सुरुवात करणार्‍या भारतीय टीमला दुसर्‍या मॅचच्याआधीच एक धक्का बसला आहे. भारताचा धडाकेबाज ओपनर वीरेन्द्र सेहवाग या स्पर्धेतून बाहेर पडला असून दुखापतीमुळे त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. 2007 ला झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप मध्येही वीरेन्द्र सेहवाग अनेक मॅचेसला मुकला होता. मात्र भारतीय टीम टी-20 वर्ल्ड चॅम्पियन झाली याचा त्याला आनंद होता. हा अनुभव त्याला यंदा टीममध्ये राहून घ्यायचा होता. मात्र या संधीला तो आता मुकला आहे.इंग्लंडमध्ये होत असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सेहवागची धडाकेबाज बॅटिंग पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. पण स्पर्धेतील प्रॅक्टीस मॅचमध्येही त्याने बाहेर बसणंच पसंत केलं. इतकंच काय तर भारताच्या बांगलादेशविरुध्दच्या पहिल्या मॅचमध्येही तो खेळू शकला नव्हता. आयर्लंडच्या मॅचपर्यंत सेहवाग फिट होईल असा विश्‍वासही धोणीने व्यक्त केला होता. पण मॅचपूर्वीच टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत सेहवागने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. खांद्याला झालेला दुखापतीमुळे सेहवागने हा निर्णय घेतला आहे. उपचारासाठी सेहवागला दक्षिण आफ्रिकेला जावं लागणार आहेआणि यासाठी त्याला कमीत कमी एक महिन्याची विश्रांतीही घ्यावी लागणार आहे.

close