भाजप-सेनेत कटुता कायम, सेनेच्या आमदारांना शपथविधीला जाण्यास बंदी

October 30, 2014 7:38 PM3 commentsViews:

sena_onbjp_news30 ऑक्टोबर : उद्याच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे नेते जाणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलीये. पण भाजप-सेनेतली कटुता कायम असल्याचं दिसतंय. रितसर आमंत्रण मिळाल्याशिवाय शपथविधीला जाणार नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलंय. तर आमदारांनाही शपथविधी सोहळ्याला जायला बंदी घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसे निरोपही आमदारांना पोहोचवण्यात आल्याचं कळतंय.

भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू केलीय. उद्याच्या शपथविधी सोहळ्यानंतर 15 दिवसांत भाजपला बहुमत सिद्ध करायचे आहे.
त्यादृष्टीने भाजपने हालचाल सुरू केली आहे. एकीकडे राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिलाय तर शिवसेनेनं ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतलीये. पण शिवसेनेच्या नेत्यांनी युती करण्याचे संकेत दिले आहे. मात्र आज या चर्चेला वेगळं वळण मिळाले आहे. कालपर्यंत पाठिंबा देण्याच्या तयारीत असलेली शिवसेना आज आक्रमक झालीये. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का ? असा सवालच सेनेनं भाजपला विचारलाय. तसंच उद्याच्या शपथविधीत सेनेच्या दोन आमदारांना मंत्रिपदाची शपथ द्यावी अशी मागणी सेनेनं भाजपकडे केलीये. पण भाजपने ही मागणी फेटाळून लावलीये.ि शवसेनेसोबत खेळीमेळीनं चर्चा सुरू आहे. चर्चेतून अजून काहीही निष्कर्ष निघालेला नाही. मात्र उद्या शिवसेनेचे मंत्री शपथ घेण्याची शक्यता कमी वाटते असं ट्विट भाजपचे नेते राजीव प्रताप रूडी यांनी केलंय. त्यानंतर सेनेनं आमदारांना शपथविधी सोहळ्याला जायला बंदी घातली आहे. रितसर आमंत्रण मिळाल्याशिवाय शपथविधीला जाणार नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे युती होणार की नाही यावरुन संभ्रम निर्माण झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Vinay

  bhajapa cha atirek zhalay. ani bhajapa cha sarakr remote control sarkar honnnar asa distay. kuthehi bhajapa chya maharashtra til mantryanche comments disat nahi ahey, fakta rudi, amit shah, modi, soni ani nadda hyanchyacha pratikriya ayakala milta ahe rajyatil mantri kay zhoplet kaay, kadsey, munbde, phadnavis ani tawde hyenche kuthe hi presence disat nahi ahey. hey kasle maharashtrachya samasya dilli madhe prabhavi paney mandu shakanar ? Aaj jar pramod mahajan, munde ani gadkari maharashtra astey tek vegle chitra bagaylla milaley astey. ani nakkich shivseneshe asha prakare vagley nastey.

  • mayur gole

   Bjp swatala bap samjtey pn ha tyancha bhram aahe lottery lagali ki chotya lokanche asech hal hotat bjp valyano lakshat theva

   • feroj pathan

    Sharad pawaranchyà kheli mule bhajapala bhaw aala aahe nahitar
    Shiwseñe shiway paryay nahi

close