आर्थर रोड जेलमध्ये सापडले 40 मोबाईल फोन !

October 30, 2014 11:43 PM0 commentsViews:

arthar road jail30 ऑक्टोबर : मुंबईमधल्या आर्थर रोड जेलची सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आर्थर रोड जेलमध्ये 40 मोबाईल फोन सापडल्याची खळबळजनक घटना घडलीये. त्याशिवाय जेलमध्ये मोठी रोकडही सापडली. खतरनाक गुंड असलेल्या अंडा सेलमध्येही मोबाईल सापडल्यानं खळबळ उडालीय. या पार्श्वभूमीवर आर्थर रोड जेलमधली सुरक्षा वाढवलीय.

आर्थर रोड जेल हे मुंबईतील एक मोठं जेल आहे. दाऊद गँग, छोटा राजन गँग, गवळी गँग तसंच वेगवेगळ्या बॉम्बस्फोटातील आरोपी या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मोठ्या गुन्हेगारांना अंडा सेलमध्ये ठेवलं जात असतं. सुरक्षेच्या कारणा तव त्यांना तिथे ठेवण्यात येतं. अंडा सेल हा जेल मधला सर्वात सुरक्षित भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, याचं अंडा सेलमध्ये तसंच इतरत्र मोबाईल सापडले आहेत. जेल प्रशासनाने ते जप्त केले आहे. काही बाबतीत पोलिसांना कळवण्यात आलं आहे. एकूण आर्थर रोड जेलमध्ये सुरू1 असलेल्या गैरप्रकाराची मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी दखल घेतली आहे. वेगवेगळ्याच्या तारखांनिमित्त आर्थर रोड जेलमधील आरोपींना वेगवेगळ्या कोर्टात नेलं जातं. या प्रवासादरम्यान हे गुन्हेगार आपल्या नातेवाईकांना, साथिदारांना भेटत असतात. यावेळी त्यांच्याकडून मोबाईल फोन घेऊन ते जेलमध्ये नेले जात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी आता कोर्टात येणार्‍या गुन्हेगारांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close