पुण्यात सात मजली इमारत कोसळली; एक मुलगा अडकल्याची भीती

October 31, 2014 9:16 AM0 commentsViews:

Pune debries

31 ऑक्टोबर : पुण्यामधील नर्‍हे आंबेगावयेथे नव्याने बांधण्यात आलेली सात मजली इमारत आज पहाटे कोसळली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र या इमारतीच्या ढिगार्‍याखाली एक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून मदतकार्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या इमारतीला तडा गेल्याने या इमारतीमध्ये राहणारी आठ कुटूंबे वेळेतचं इमारतीबाहेर आली होती त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे ही इमारत फक्त एक वर्ष जुनी असून या इमारतीच्या बांधकामाकरिता केवळ तीनचं मजल्यांची परवानगी असताना सहा मजल्यांचं बेकायदेशीर काम केलं असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बिल्डरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या दुर्घटनेमुळे पुण्यातील बेकायदेशीर इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close