सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’

October 31, 2014 9:36 AM0 commentsViews:

B1P5NToCIAAS7rB

31 ऑक्टोबर :  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटी म्हणजेच एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी पटेल चौकात जाऊन सरदार पटेलांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर त्यांनी ‘एकता दौड’ला झेंडा फडकवला. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व देशवासियांना एकात्मतेची शपथ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘रन फॉर युनिटी’मध्ये उत्साहात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या सोबत अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंगही उपस्थित होते.

‘जी व्यक्ती इतिहास विसरते ती कधीच इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळेच आपण ऐतिहासिक नेत्यांचा विसर पडू देऊ नये, असं पंतप्रधान म्हणाले. जरी अनेक राज्य असली तरी आपले राष्ट्र एक आहे, देशात अनेक रंग असले तरीही तिरंगा एकच आहे, असं सांगत विविधतेत एकता हीच आपल्या राष्ट्राची ओळख असल्याचं ते म्हणाले. आपण सर्व भारतीय जात, धर्म आणि समाज या मर्यादांच्या ओलांडून एकत्र येऊ, अशी शपथही त्यांनी देशवासियांना दिली.

दरम्यान, मुंबईतही आज (शुक्रवारी) एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. नरिमन पॉइंटपासून ही दौड सुरू झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी झेंडा दाखवल्यानंतर दौडला सुरुवात झाली. यावेळी राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close