देवेंद्र फडणवीसांसोबत दहा जण घेणार मंत्रिपदाची शपथ

October 31, 2014 12:22 PM0 commentsViews:

2

31 ऑक्टोबर : देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे सत्ताविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज दुपारी साडेचार वाजता वानखेडे स्टेडियमवर एका भव्य समारंभामध्ये देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाचा समावेश असणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत आज दहा जण घेणार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये कोअर कमिटीतील 5 जणांचा समावेश आहे.

या मंत्रिमंडळात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्वपूर्ण खात्याची जबाबदारी असणार आहे. त्यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार,एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे. कोअर कमिटीशिवाय भाजपच्या आणखी दोन आमदारांना शपथ दिली जाणार आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, विष्णू सावरा यांचंही नाव निश्चित झाल्याचं कळतं आहे.  त्याच बरोबर दिलीप कांबळे आणि विद्या ठाकूर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

भाजपचे कोणते आमदार आज शपथ घेणार ?

- एकनाथ खडसे
- विनोद तावडे
- सुधीर मुनगंटीवार
- पंकजा मुंडे
- विष्णू सावरा
- चंद्रकांत पाटील – विधान परिषद
- प्रकाश मेहता

यांच्याबरोबर दोन राज्यमंत्रीही शपथ घेणार
- दिलीप कांबळे
- विद्या ठाकूर – गोरेगाव

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close