पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीतून निलंबित

June 10, 2009 12:53 PM0 commentsViews: 2

10 जून पद्मसिंह पाटील यांना पक्षातून निलंबित केलं असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत जाहीर केलं. पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास सुरू असेपर्यंत पद्मसिंह पाटील निलंबित राहणार आहेत, अशी माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीच्या केंद्रीय डिसीप्लीनरी समितीने त्यांना प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केलं असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. पाटील हे लोकसभेचे सदस्य राहतील पण त्यांना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. ' पद्मासिंग पाटील हे पवनराजे निंबाळकर प्रकरणात दोषी आहेत, असं आम्ही मानत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबीत करत आहे. जर पाटील यांना सीबीआयने पवनराजे प्रकरणातून निर्दोष जाहीर केलं तर राष्ट्रवादी त्यांना परत पक्षात घेईल, अशीही माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

close