टू-जी घोटाळा प्रकरणी ए राजा, कनिमोळींवर आरोप निश्चित

October 31, 2014 1:22 PM1 commentViews:

kanimozhi-and-a-raja

31 ऑक्टोबर : टू-जी घोटाळा प्रकरणी स्पेशल कोर्टाने 19 जणांविरोधात आज (शुक्रवार) आरोप निश्चित केले आहेत. त्यात माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, डीएमकेच्या खासदार कनिमोळी आणि डीएमके प्रमुख करुणानिधी यांच्या पत्नी दयालू अम्मल यांच्या विरोधातही आरोप निश्चित झाले आहेत. एकूण 19 आरोपींविरुद्ध कोर्टाने आज (शुक्रवारी)आरोप निश्चित केले. गैरव्यवहार केल्याचा ठपका अंमलबजावणी संचालनालयाने ठेवला आहे. दिल्लीतील पटियाळा हाऊसमधील विशेष न्यायालयामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने याचिका दाखल केली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • आग्स

    यांना फाशी द्या. म्हणजे कळेल कि जनतेचा पैसा खाल्ला कि कस होत ते.

close