नाराजीनाट्यावर पडदा, उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थिती

October 31, 2014 4:45 PM1 commentViews:

uddhav in wankhede31 ऑक्टोबर : अखेर शिवसेना आणि भाजपमध्ये मानापानाचे नाट्य अखेर मिटले आहे. उद्धव ठाकरे शपथविधीला जाणार की नाही यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. शिवसेनेनं आपली नाराजी दूर सारुन शपथविधीला उपस्थिती राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यांच्यासह सेनेचे सर्व आमदारही या शाही सोहळ्याला हजर होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर फोन केल्यानंतर सेनेनं उपस्थिती राहण्याचा निर्णय घेतलाय.

आज भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतली. यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळा आयोजित केलाय. या शपथविधीला देशभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहे पण शिवसेनेनं शपथविधीला न जाण्याचा पवित्रा घेतलाय.
आजच्या शपथविधीत सेनेच्या दोन जणांना मंत्रिपदाची शपथ द्यावी अशी मागणी सेनेनं केली होती. त्यामुळे सेनेनं शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. अखेर खुद्ध भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शपथविधीला हजर राहण्याची विनंती केलीये. एवढेच नाहीतर मातोश्रीवर कार्यक्रमाचा व्हीव्हीआयपी पास सुद्धा पोहोचला होते. मातोश्रीच्या ऑपरेटरकडे भाजपच्या एका कार्यकर्त्याने व्हीव्हीआयपी आमंत्रण नेऊन दिलं होतं. शहा यांच्या फोननंतर सेनेनं नरमाईची भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे वानखेडे स्टेडियमकडे रवाना झाले होते. त्यांच्यासह सेनेचे सर्व आमदारही वानखेडेवर पोहचले. मात्र फडणवीस यांनी शपथ घेण्यास सुरुवात केल्यानंतर ते थोड्याउशिराने पोहचले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pratip

    Der Aaye…. durust aaye

close