बेस्टची मुंबईकरांना खास भेट

June 11, 2009 10:50 AM0 commentsViews: 1

11 जूनलोकलनंतर मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या बेस्टच्या बसेसमध्ये नवीन सॉफ्टवेअर बसवण्यात आलं आहे. या सॉफ्टवेअरमुळे बेस्टच्या बसेसचे मार्ग आणि स्टॉपची माहिती मोबाईलवर मिळू शकेल. एवढंच नाही तर हॉस्पिटल्स, एटीएम, बँक आणि हॉटेल्स याविषयीची माहितीसुद्धा प्रवाशांना बसमध्ये बसवलेल्या नवीन सॉफ्टवेअरमुळे जागच्या जागी मिळणार आहे. बुधवारपासूनच या सेवेला सुरुवात झाली. याशिवाय पुढील स्टॉप कोणता याचीही माहिती मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत दिली जाणार आहे. बसेससाठीही स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. बेस्टच्या या सेवेचं मुंबईकरांनी स्वागत केलंय.

close