मी, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस…

October 31, 2014 4:53 PM0 commentsViews:

Devendra Oath31 ऑक्टोबर :‘मी, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतो की…’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या 27 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीस यांनी मराठीतून शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस शपथ घेण्यासाठी उभे राहिले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम अक्षरश: डोक्यावर घेतलं. यावेळी व्यासपिठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी आणि इतर मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार झाले. त्यांच्यानंतर एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे,प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर, विष्णू सावरा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपला राज्यात पहिल्यांदाच सत्तेचा मान मिळाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘याची देही याचा डोळा’ असा हा महाशपथविधी सोहळा डोळ्यात साठवून घेतलाय. शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नरेंद्र मोदी,शहा, अडवाणी यांनी अभिनंदन केलं. त्यानंतर फडणवीस यांनी व्यासपिठावरुन खाली उतरुन भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी हस्तादोलन केलं.

यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
एकनाथ खडसे
सुधीर मुनगंटीवार
विनोद तावडे
पंकजा मुंडे
दिलीप कांबळे
प्रकाश मेहता
विद्या ठाकूर
विष्णू सावरा

शपथविधीला हे मान्यवर  हजर

या शानदार शपथविधी सोहळ्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हजर होते. त्याशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, अनंतकुमार, भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनीसुद्धा हजेरी लावली. शिवसेना आणि भाजपमधली कटुता बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी सपत्नीक हजेरी लावली. नीलम गोर्‍हे आणि दिवाकर रावते हेसुद्धा शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते. त्याशिवाय सीमांध्रचे चंद्राबाबू नायडू उपस्थित होते आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेलसुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित होते. याशिवाय सर्व धर्मिय साधू आणि गुरुंनासुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलंय. तर बॉलिवूडनगरीतून ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, दिग्दर्शक मधुर भांडारकर, मुग्धा गोडसे, पूनम धिल्लाँ यांनी शपथविधीला हजेरी लावली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close