भाजपतले वाद उघड : सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर टीका

June 11, 2009 10:54 AM0 commentsViews: 1

11 जून, दिल्ली भाजपमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. भाजपच्या पहिल्या आणि दुसर्‍या पिढीच्या नेत्यांमध्ये दुफळी निर्माण केल्याबद्दल सुधींद्र कुलकर्णी यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. सुधींद्र कुलकर्णी यांनी 4 दिवसांपूर्वी एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी निवडणुकीतल्या भाजपच्या दुसर्‍या पिढीच्या नेत्यांना पराभवासाठी जबाबदार ठरवलं होतं. तसंच मंगळवारी झालेल्या पक्षाच्या संसदीय बैठकीमध्ये अरुण शौरी यांनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर टीका केली होती. अरुण जेटली यांनाही त्यांनी पक्षाच्या पराभवाची कारणं विशद करणारा दुसरा लेख लिहल्याबद्दल जाब विचारला आहे.पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी मात्र यावर भाष्यं करण्याच टाळलं आहे. तर या वादविवादात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. ती म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते जसवंत सिंग. भाजपचं धोरण ठरवणारे कॉलम लिहून आल्याने तेही अस्वस्थ आहेत. व्यंक्कैया नायडू यांनी पक्षात कोणीतेही वादविवाद नसल्याचं म्हटलं आहे. मात्र संघाने सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर अशा पद्धतीने पक्षातले मतभेद जाहिररित्या चव्हाट्यावर आणल्याबद्दल टीका केली होती. सुधींद्र कुलकर्णी यांना दोषी ठरवलं गेल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जिनांच्या वेळी अडवाणींवर टीका झाली होती , तेव्हा या वादाचे शिल्पकार सुधींद्र कुलकर्णीच होते, असंही म्हटलं गेलं. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पण निवडणुकीच्या काळात ते पुन्हा पक्ष प्रवक्ते म्हणून पुढे आले. गेल्या चार वर्षांपासून कुलकर्णी हे अडवाणींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेकांचं म्हणणं आहे की, कुलकर्णी जे काही बोलतात ते वास्तविक अडवाणींचं म्हणंणं असतं.

close