राजकीय गुन्हेगारीविरोधात अण्णा हजारेंचं आंदोलन

June 11, 2009 11:02 AM0 commentsViews: 2

11 जून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकारणातल्या वाढत्या गुन्हेगारीविरोधात एक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी ते राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्या दौर्‍याची सुरुवात बुधवारी राळेगणसिद्धीतून झाली आहे. राजकारणातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे आंदोलन छेडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राजकारणातल्या गुन्हेगारीवर जनजागृती करण्यासाठी तरूणांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी तेरणा साखर कारखान्यातील भ्रष्टाचार उघडकीला आणण्यासाठी अण्णा हजारेंनी आणखी एक मोहीम हाती घेतली होती.

close