एटीएस प्रमुखांची नियुक्ती : हायकोर्टाने दिली 4 आठवड्यांची मुदत

June 11, 2009 1:14 PM0 commentsViews: 4

9 जून, मुंबईचार आठवड्यांच्या आत सरकारने एटीएस प्रमुखांची नियुक्ती करावी, असे आदेश मुंबई हाय कोर्टाने दिले आहेत. सुरक्षा समितीने सुरक्षेबाबत कोणते निर्णय घेतले. आणि त्यांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्याच्या सुरक्षेबाबत ढिसाळपणा दाखवल्याबद्दल हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढलेआहेत. मुंबई हल्ल्याबाबतच्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने राज्य सरकारची कानउघाडणी केली. एटीएस प्रमुखांची जागेवर अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही. 26/11 च्या मुंबई हल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर गेले 7 महिने ही जागा रिकामी आहे. तसंच राज्याच्या सुरक्षा समितीनं गेल्या अडीच महिन्यांत सुरक्षेबाबत एकही निर्णय घेतला नसल्याचं कोर्टाने म्हटलंआहे.

close