खासगी कंपन्यांमधल्या भूमिपुत्र आणि परप्रांतियांची होणार मोजणी

June 11, 2009 1:26 PM0 commentsViews: 2

11 जून राज्यातल्या खासगी कंपन्यांमध्ये किती भूमिपुत्र आणि किती परप्रांतीय आहेत, याचा तपशीलवार आढावा घ्यावा, असा निर्णय आज विधानसभेत घेण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी तशा सूचना राज्याचे कामगार मंत्री नवाब मलिक यांना दिल्या. अनेक खाजगी कंपन्यांमध्ये परप्रांतियांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य असावं या नियमाचा भंग होतो, असं अनेक सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे बाबासाहेब कुपेकरांनी हा निर्णय घेतला आहे.

close