पुण्यातल्या कचर्‍याच्या समस्येवर निघणार 16 जूनपूर्वी तोडगा

June 11, 2009 1:28 PM0 commentsViews: 60

11 जून पुण्यातल्या कचर्‍याच्या समस्येवर 16 जूनच्या आधी म्हणजे अधिवेशन संपण्याआधी तोडगा काढणार असल्याचं नगरविकासराज्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधीमंडळात आश्वासन दिलं आहे. त्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, असंही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात निर्माण झालेली कचर्‍याची समस्या आणि त्याविरोधात झालेल्या उरळी देवाची इथल्या गावकर्‍यांच्या आंदोलनाची दखल घेत आज सभागृहात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. यावर सरकारतरर्फे नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. तसंच, कचर्‍याच्या विल्हेवाटीसंदर्भात गावकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.

close