भारतात सापडले H1N1चे आणखी तीन रुग्ण

June 12, 2009 10:13 AM0 commentsViews: 3

12 जून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या H1N1 ची लागण झालेले रुग्ण तीन रुग्ण भारतात सापडले आहेत. गुरुवीरी दिल्लीत H1N1 व्हायरसची लागण झालेल्या तीन रुग्णांना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यात बोस्टनहून आलेल्या 18 वर्षांच्या विद्यार्थ्यांचा, हैतीहून आलेल्या एका 41 वर्षांच्या महिलेचा तर न्यूयॉर्कमधून आलेल्या 25 वर्षांच्या तरुणीचा समावेश आहे. याशिवाय गोव्यात एक पेशंट आढळला आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतात या व्हायरसचे एकूण पंधरा पेशंट्सची नोंद झाली आहे. त्यात हैदराबादमध्ये 7, दिल्लीत 5, कोईम्बतूरमध्ये 2 आणि गोव्यात एक पेशंट यांचा समावेश आहे. H1N1च्या रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या असा आदेश देण्याचा दिल्ली सरकारचा विचार आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने H1N1 व्हायरसला ' जागतिक महामारी ' म्हणून जाहीर केलं आहे.

close