शिवसेनेच्या सिडको बंदला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद

June 12, 2009 3:14 PM0 commentsViews: 6

12 जून नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारीविरोधात शिवसेनेने आज 'सिडको बंद'चं आवाहन केलं होतं. या बंदला चांगला प्रतिसाद मिळला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज 'सिडको बंद'च आंदोलन करण्यात आलं होतं.गेल्या काही दिवसांपासून नाशिकमच्या सिडकोमध्ये गुंडांनी नागरिकांची 40 वाहनं जाळून परिसरात घबराट पसरवण्याचा प्रयत्न केला होता. गुंडांच्या या अरेरावीमुळे सिडको शहरातली कायदा सुव्यवस्था विस्कळीत झाल्याप्रकरणी 'आयबीएन-लोकमत'ने आवाज उठवला. त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी शहरात हजेरी लावली. पण आपापल्या पक्षातील गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्याचं सर्वांनीच टाळलं आहे. मात्र लोकांचा संताप लक्षात घेऊन जाहीर आंदोलनं सुरू केली आहेत.

close