भारताला सुपर-8मध्ये पराभवाचा धक्का

June 13, 2009 7:18 AM0 commentsViews: 5

13 जून भारताला टी-20 वर्ल्डच्या कपच्या सुपर-8मध्ये पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. सुपर 8 मधील पहिल्याच मॅचमध्ये भारताला विंडीजकडून हार पत्करावी लागली आहे. वेस्ट इंडिजच्या बॉलिंगसमोर भारतीय बॅटिंग सपशेल कोसळली. 12 ओव्हर नंतर भारताची स्थिती 66 रन्सवर 4 विकेट होती. त्यानंतर मात्र युवराज सिंगने सूत्र हातात घेतली. आणि चमत्कार घडला. रन्सचा पाऊसच सुरू झाला. त्याने युसुफ पठाण सोबत 64 रन्सची वेगवान पार्टनरशीप केली. युवराजने 67 तर युसुफने 31 रन्स केले. विजयासाठी 154 रन्सचा पाठलाग करताना ख्रिस गेलने आणि आंद्रे फ्लेचर लगेचच आऊट झाले. पण त्यानंतर सिमॉन्स आणि ब्राव्होने टीमला शानदार विजय मिळवून दिला. ब्राव्होने नॉट आऊट 66 रन्स केले तर सिमॉन्सने 44 रन्स केले. नॉट आऊट 66 रन्स आणि 4 विकेट अशी ऑलराऊंडर कामगिरी करणार्‍या ब्राव्होला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. ब्राव्होच विंडीजच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने सिमोन्ससोबत भारतीय बॉलर्सची पीटाई करीत विंडीजला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये भारतीय बॉलर्सविरुद्ध खेळण्याचा अनुभव ब्राव्होला आहे. त्यामुळे त्याने चौफेर फटकेबाजी केली. भारताच्या स्पिनर्सवर त्याने हल्लाबोल केला. ब्राव्होने अवघ्या 36 बॉल्समध्ये नॉट आऊट 66 रन्स केले. त्यात 4 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. ब्राव्होने 183 च्या स्ट्राईक रेटने रन्स वसूल केले. तर सिमोन्सने 37 बॉल्समध्ये 44 रन्स केले. त्यात 5 फोरचा समावेश होता. सिमोन्सचा स्ट्राईकरेट 118 होता.

close