मुंबईचे पोलीस कमिशनर हसन गफूर यांची पदावरून उचलबांगडी

June 13, 2009 10:38 AM0 commentsViews: 2

13 जून मुंबईचे पोलीस कमिशनर हसन गफूर यांची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्यांची पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे कमिशनर पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मुंबई हल्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या राम प्रधान समितीच्या अहवालात, मुंबई पोलीस कमिशनरांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. विधीमंडळात यावर चर्चा होण्यापूर्वीच सरकारने गफूर यांची खात्याअंतर्गत बदली करून टाकली आहे.

close