कानडीनामा, अखेर बेळगावचं झालं ‘बेळगावी’

November 1, 2014 1:08 PM0 commentsViews:

522348650-belgaum_601 नोव्हेंबर : अखेर बेळगावचं नाव बदलून बेळगावी झाल्याची औपचारिक घोषणा आज (शनिवारी) झाली. तशी अधिसूचना कर्नाटक सरकारनं काढली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी थंड होताच केंद्र सरकारने बेळगावच्या नामांतराला परवानगी दिली होती. त्यानंतर आज कर्नाटक सरकारने राज्योत्सव दिवसाच्या औचित्य साधत बेळगावीवर शिक्कामोर्तब केलं.

1 नोव्हेंबर 1956 साली झालेल्या भाषा वार प्रांत रचनेत सीमा कर्नाटकातसामील केल्याच्या निषधार्थ बेळगावात काळा दिन/सुतक दिन म्हणून पाळला जातो तर कर्नाटक सरकार राज्योत्सव दिवस साजर करत असतो. एकीकरण समितीच्या वतीने आयोजित काळ्या दिनाच्या सायकल फेरीत हजारोच्या संख्येने मराठी भाषिक दंडाला काळ्या फिती बांधून सायकल फेरीत सामील होत असतात 2 वर्षाच्या लहान मुलासह वयाच्या 80 वर्षाचे वृद्ध मंडळी देखील या सायकल रॅलीत भाग घेवून कर्नाटक सरकारचा निषेध असतात. बेळगाव शहराचे नामांतर बेळगावी करू नये आणि नवं निर्वाचित महाराष्ट्र सरकारने बेळगाव घ्यावी अशा आशयाचे फलक या सायकल फेरीत झळकत होते. दरवर्षी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभाग घेतला म्हणून मराठी महापौर उपमहापौर सरकारकडून कारवाई गेली होती. या वर्षी कारवाईच्या भीतीने महापौर महेश नाईक आणि नगरसेवकांनी सायकल फेरीत भाग घेतला नाही. याचा मराठी भाषिक लोकांनी घोषणाबाजी करुन महापौरांचा विरोध केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close