उसाची पहिली उचल किती ? ‘स्वाभिमानी’ची आज परिषद

November 1, 2014 12:12 PM0 commentsViews:

Image img_177512_rajusheti_240x180.jpg01 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 13 वी ऊस परिषद होणार आहे. आज दुपारी ही ऊस परिषद होणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे आज पहिल्या उचलीची म्हणजेच पहिल्या दराची मागणी करणार आहेत. दोन दिवासंापूर्वी शेट्टी यांनी सरकारने जर शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं तर आंदोलन करू असा इशारा दिलाय, त्यामुळे आजच्या स्वाभिमानीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलंय.

जयसिंगपूर इथल्या नगरपालिकेच्या मैदानावर ही ऊस परिषद होणार असून कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर आणि इतर जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं या ऊस परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उसाच्या गळीत हंगामाबाबत अजून कोणताही निर्णय न झाल्याने आता शेतकरी चिंतेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात उसांना तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचं वजन मोठ्या प्रमाणात घटून नुकसान होण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबरपासून राज्यातले साखर कारखाने सुरू होतील, असं सांगण्यात आलं होतं. पण आता नोव्हेंबर महिना आला तरीही कारखाने सुरू न झाल्यानं गळित हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close