बांद्रा-वरळी सी-लिंकचं अनावरण लांबणीवर

June 13, 2009 10:51 AM0 commentsViews: 8

13 जून बांद्रा-वरळी सी-लिंकचं उद्घाटन थोडं लांबणीवर पडणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या सि-लिंकसाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. 20 जूनला बांद्रा-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी खुला होणार होता. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बहुचर्चित बांद्रा-वरळी सी-लिंकची पाहणी केली. अनेक वर्षं रखडल्यानंतर बांद्रा-वरळी सी-लिंकचं काम पूर्ण झालं आहे. या सी-लिंकमुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम मुबंईतल्या उपनगरांमधली वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. मुंबईकर हा सागरी पूल खुला होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 20 जूनला बांद्रा-वरळी सी-लिंक वाहतुकीसाठी खुला होणार होता. पण आता तो लांबणीवर पडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

close