राज ठाकरेंनी घेतली पाथर्डीतील दलित कुटुंबीयांची भेट

November 1, 2014 4:01 PM0 commentsViews:

raj in pathardi01 नोव्हेंबर : पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणार्‍या पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटाच आहेत. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर राजकीय पक्षांनी पाथर्डीकडे धाव घेतलीये. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवखेडा इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

पाथर्डीतल्या जवखेडामध्ये तिहेरी हत्याकांड होऊन आता 11 दिवस उलटले आहेत. पण अजूनही या हत्याकांडातले आरोपी मोकाटच आहेत. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पाथर्डी तालुक्यातल्या जवखेडात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित कुटुंबीयांना त्यांनी 1 लाख रुपये मदतीची घोषणा केली. तसंच मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट घालून देणयाचं आश्वासनही दिलं. राज ठाकरे यांच्यासोबत गटनेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सुद्धा होते. यापूर्वीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले या नेत्यांनी भेट दिलीये. या हत्याकांडाच्या विरोधात राज्यभर निदर्शनंही करण्यात आली. अहमदनगर जिल्हाच अत्याचारग्रस्त जाहीर करावा अशी मागणीही करण्यात येतेय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close